Akola Marathi News One application rejected in Telhara scrutiny six Gram Panchayats likely to be in contention applications of 832 candidates 
अकोला

छाननीत एक अर्ज नामंजूर, सहा ग्रामपंचायती अविरोध होण्याची शक्यता, ८३२ उमेदवारांचा अर्ज

सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) :  तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमधून ३२२ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ८२३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एक अर्ज नामंजूर करण्यात आला. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती अविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .


गुरुवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी तहसील कार्यालय येथे करण्यात आली. यामध्ये बेलखेड येथील एका उमेदवाराचा अर्ज नामंजूर करण्यात आला. सदर उमेदवाराचे नाव मतदार यादीमध्ये नसल्यामुळे ८२३ पैकी एकमेव अर्ज नामंजूर करण्यात आला.

एका उमेदवाराने आपले नामनिर्देशनपत्र मागे सुद्धा घेतले. तालुक्यात होऊ घातलेल्या ३४ ग्रामपंचायतींपैकी चांगलवाडी, खेल सटवाजी, वरुड बिहाडे , जस्तगाव, राणेगाव , वडगाव रोठे या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

कारण या सहा ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये केवळ एक किंवा दोनच अर्ज शिल्लक असल्यामुळे सदर एक दोन उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे याकरिता गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या सहा ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांनी बसून पॅनल तयार केल्याचे समजते.

या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक-दोन अर्ज शिल्लक असल्यामुळे त्याचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याकरिता त्यांची मोठी मनधरणी करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ४ जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत कोण कोण उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतात? कोणते प्रभाग कोणत्या ग्रामपंचायती अविरोध होतात? याचे संपूर्ण चित्र ४ जानेवारीला दुपारून स्पष्ट होणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT